वा.म. जोशी आजही प्रस्तुत का वाटतात?
मराठी वाङ्येतिहासातील १८८५ ते १९२० या महत्त्वपूर्ण कालखंडात दामन मल्हार जोशी यांचा उदय झाला; इतकेच नव्हे तर कादंबरीकार व कथाकार म्हणून त्यांनी नावलौकिकही मिळवला. हा नावलौकिक दुहेरी स्वरूपाचा होता. एकीकडे वामन मल्हारांनी तत्कालीन बुद्धिजीवी, रसिक वाचकांशी आपल्या कादंबच्यातून — विशेषतः रागिणीतून — संवाद साधला; आणि दुसरीकडे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारख्या साक्षेपी समीक्षकाचे तत्काल लक्ष वेधून घेतले. …